Amol Kolhe Tweet : अजित पवारांना पहिला धक्का, अमोल कोल्हेंनी साथ सोडली, शरद पवारांना पाठिंबा

Amol Kolhe Tweet : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांना पहिला धक्का बसला आहे. कारण शपथविधीला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपण शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असं अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे काल (2 जुलै) राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होतं. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.

 

‘मी शरद पवार साहेबांसोबतच आहे’

याबाबत एबीपी माझाशी संवाद साधताना अमोल कोल्हे म्हणाले की, “काल शपथविधीची मला कल्पना नव्हती. मी वेगळ्या चर्चेसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. त्यावेळी अचानक शपथविधी झाला. पण माझी भावना आहे की मी शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी जाहीरपणे सांगतोय, साहेबांना भेटूनही सांगेन की मी त्यांच्यासोबतच आहे. वडिलधाऱ्यांना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे. काल शपथ घेणाऱ्यांचं मी अभिनंदन केलं. पण शपथ घेतली म्हणून अभिनंदन केलं, मात्र मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण हाच माझ्यासाठी धक्का होता. ज्यांनी शपथ घेतली त्यांचा तो निर्णय होता.

अजित पवारांसह नऊ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश

महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली राजकीय भूकंप झाला आहे. मागच्या वेळी भाजपकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेना टार्गेट होती, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. भाजपला अखेर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात यश आलं आहे. अजित पवार यांनी आमदारांना सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी केली. अजित पवार याच्यासह राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

हेही वाचा

राष्ट्रवादीचे आमदारच नव्हे, ‘हे’ दोन खासदारही अजित पवारांसोबत; शरद पवारांना मोठा धक्का

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This