बुलढाण्यात प्रवासी बसचा मोठा अपघात 25 प्रवाशांचा मृत्यू प्रवाशांनी सांगितला अपघाताचा थरार नागपूर महाराष्ट्र अपघात

Buldhana Accident : बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. तर यामधील आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी ही भीषण घटना घडली. दरम्यान, या अपघातानंतर सुखरुप बाहेर पडलेल्या प्रवाशांनी अपघाताचा थरार सांगितला आहे. 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलेल्या दोन प्रवाशांनी या अपघाताची माहिती सांगितली आहे.  

बसची वरची खिडकी तोडली आणि बाहेर पडलो

नागपूरहून औरंगाबादकडे निघालेला काही प्रवाशांनी घडलेल्या या अपघाताचा थरार सांगितला. आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासानं बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर ही बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर लगेच बसने पेट घेतल्याची माहिती बसमधील प्रवाशांनी दिली. आम्ही 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले.   

आग एवढी भयंकर लागली होती की…

बस पलटी झाल्यानंतर लगेच बसला आग लागली. त्यानंतर टायरही फुटल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली. परत डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील दाखल झाल्या. पण आग एवढी भयंकर लागली होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली. 

पोलीस अधिकारी काय म्हणाले 

साधारण रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या बसचा अपघात झाला. यामध्ये 33 प्रवाशी होते. यातील 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ प्रवाशी बचावले आहेत. पलटी झाल्यानंतर बसने पेट घेतला. त्यामुळं आतील प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बस पलटी झाल्यानंतर टायर फुटल्याची माहिती ड्रायव्हरने दिली आहे. त्यानंतर डीझेल टँकला धडक बसली त्यानंतर टँक फुटल्याने बसने पेट घेतला. त्यानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. जिथून रस्ता मिळाला तेथून प्रवासी बाहेर पडले. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसच्या कॅबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. त्यातील एक जण झोपला होता. तर दुसरा ड्रायव्हर गाडी चालवत होता. यातील एक ड्रायव्हर बचावला आहे, तर एक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Buldhana Accident : बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू 

 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This