इलॉन मस्क विरुद्ध मार्क झुकरबर्ग केज फाईट इटलीमध्ये होणार आहे टेस्ला सीईओ उघड

Zuckerberg vs Musk Fight : मेटाचे (Meta) सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यात होणारी लढत सध्या चर्चेचा विषय आहे. एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात मिस्क्ड मार्शल आर्टिस्ट फाइट (MMA Fight) होणार आहे. या फाइटकडे सर्वात बहुप्रतिक्षित लढत म्हणून पाहिलं जात आहे. या केज फाइटकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असून कोण जिंकणार हे उत्सुकतेचं ठरणार आहे.

मस्क आणि झुकरबर्ग यांच्यात महामुकाबला

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क यांच्यात जगातील सर्वात मोठ्या ॲम्फीथिएटरमध्ये केज फाईट रंगणार आहे. Tmz स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, या लढतीसाठी इटालियन सरकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला भेटले आहेत. हा सामना जगातील सर्वात मोठ्या ॲम्फी थिएटरमध्ये म्हणजेच इटलीतील कोलोसिअम (Colosseum) या मैदानात होणार आहे. ट्विटर आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी अलिकडेच एका ट्विटमध्ये या लढतीचे संकेत दिले होते. 

कोण मारणार बाजी?

मार्क झुकरबर्गची उंची पाच फूट आठ इंच आहेत तर, एलॉन मस्कची उंची सहा फूट दोन इंच आहे. या प्रकारच्या लढाईत फायटरची उंची आणि वजन याचा फारसा फायदा होत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

‘ही’ एमएमए फाइट होण्यामागचं कारण काय?

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग जिउ-जित्सूचे खेळाडू आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला ते प्रतिस्पर्ध्याच्या शोधात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून एलॉन मस्क यांनी ट्विट केलं की, ते केज फाईटमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहे. यानंतर मेटाचे सीईओ झुकरबर्ग यांनी टेस्लाचे सीईओ मस्क यांना लोकेशन पाठवण्यास सांगितलं. तेव्हापासून सोशल मीडियावर लोक सतत दोघांच्या लढतीची चर्चा सुरु आहेत आणि प्रत्येक जण या लढतीसाठी उत्सुक आहे.

दोघांपैकी कोण-किती ताकदवान?

ट्विटर आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क 6 फुटांपेक्षा जास्त उंच आहेत तर, मार्क झुकरबर्ग 5 फूट 8 इंच उंच आहेत. मस्क यांच्याकडे लांबीच्या बाबतीत झुकत माप आहे. मस्क यांना केवळ उंचीचा फायदा नाही तर त्यांचं वजनही जास्त आहे. मेटाचे सीईओ देखील मार्शल आर्ट्सचे चॅम्पियन आहेत. काही दिवसांपूर्वी मार्क झुकरबर्ग यांनी एका स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिथे त्यांनी त्यांच्या जिउ-जित्सू कौशल्य दाखवली. झुकरबर्ग यांनी सिलिकॉन व्हॅली स्पर्धेत पहिलं सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This