शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), फलटण यांच्यावतीने होऊ चर्चा… कार्यक्रम संपन्न.

गिरवी, दि. 08 ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुका यांच्या वतीने दिनांक 8/10/2023 रोजी झिरपवाडी – दुधेबाबी – गिरवी – निरगुडी- फलटण शहर (माळजाई मंदिर मार्केट) या ठिकाणी “होऊ द्या चर्चा… बोलघेवढ्या सरकारी योजनाचा पोलखोल” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे फलटण तालुका प्रमुख श्री. विकास नाळे, शहर प्रमुख श्री. निखिल पवार, युवासेना तालुका अधिकारी श्री अभिजित कदम युवासेना शहर प्रमुख श्री. अक्षय तावरे, माथाडी कामगार सेना तालुकाध्यक्ष श्री. नंदकुमार काकडे, श्री. प्रवीण पवार, राजू भाई, तसेच महिला आघाडीच्या फलटण तालुका संघटीका श्रीमती. लताताई तावरे दुधेबावी येथे व शिवसेना माजी उप तालुका प्रमुख श्री ज्ञानेश्वर चव्हाण हे झिरपवाडी येथे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This