दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान

सातारा, दि. 9 : राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत राज्यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यातील शासनाचे विविध विभाग, महामंडळे, स्वयंसेवी संस्था व अशासकीय संघटना अशा सुमारे 39 विभाग व कार्यालये सहभागी होणार आहेत. या अभियानाचाच एक भाग म्हणुन सातारा जिल्हयामध्ये दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे सकाळी 10 वाजता या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध विभागांतील योजनांची माहिती देण्यासाठी विभागांचे स्टॉल लावले जाणार असुन विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच शासनाच्या विविध विभागाकडुन दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचे लाभही दिले जाणार आहेत. सदर अभियान कार्यक्रमासाठी जिल्हयातील मान्यवर व्यक्ती तसेच दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु उपस्थित राहणार आहेत. तरी या अभियानात जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन  जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी, व ज्ञानेश्वर खिलारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This