इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा, दि.11 : इतर मागास प्रवर्गामधील पात्र व्यक्तीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना, बीजभांडवल योजना, वैयक्तिक कर्ज ब्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अशा एकूण 7 योजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.

वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना पुर्णपणे ऑनलाईन असुन अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

इच्छुकांनी सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिक माहितीकरिता इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याबाबतचा मूळ जातीचा दाखला व आधार कार्डसह स्वतः जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा माळा, खोली नं. ३, सर्व्हे नं. २२/अ, जुना एम.आय.डी.सी.रोड, बॉम्बे रेस्टॉरन्ट उड्डाण पुलाजवळ, सातारा दुरध्वनी क्रमांक ०२१६२-२९५१८४ या पत्यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, सातारा यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This