दिव्यांगांनी वैयक्तीक लाभाच्या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा, दि.10 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या वैयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची माहिती घेऊन दिव्यांगानी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी केले आहे.

इयत्ता 1 ते 10 साठी शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना, शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना, दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना, दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना व दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे (कॅलिपर, बुट, तीन चाकी सायकल, कर्णबधीरांसाठी श्रवणयंत्र, गरजुंना चष्मे) अशा वैयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या लाभासाठी दिव्यांगांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असेहीआवाहन डॉ. घाळवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This