आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ

सातारा, दि.13 : 13 ऑक्टोबर आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा जितेंद्र डूडी यांनी आपत्ती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भगवान कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपविभागीय अधिकारी सातारा सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी जावली दादासाहेब दराडे तसेच तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नायब तहसीलदार आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This