पी एन जी अँड सन्स व पी एम डी मिल्क तर्फे एक हजार कुटुंबास मोफत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वाटप….

फलटण, दि. 15 : पी एन जी गाडगीळ अँड सन्स आणि पी एम डी मिल्क बारामती यांचे यांच्या सामाजिक बांधिलकीतून फलटण येथे पुना गाडगीळ अँड सन, पी एम डी मिल्क & फुड्स बारामती व शुक्रवार पेठ तालिम मंडळ फलटण यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्री उत्सवानिमित्त मोफत दुध व मिठाई वाटप चा कार्यक्रमाचा शुभारंभ पी एम डी मिल्क चे संस्थापक श्री हनुमंतराव मोहिते व शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. फिरोज आतार साहेब मा. नगरसेवक, फलटणचे तहसीलदार श्री. अभिजीत जाधव साहेब, फलटण नगरपरिषद फलटणचे सीओ श्री गायकवाड साहेब ,पुना गाडगीळ अँड सन्स चे श्री राजेश सोनीसाहेब, फलटण शाखा प्रमुख श्री इतापे साहेब व शुक्रवार पेठ तालीम मंडळ फलटण चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाला
यावेळी या कार्यक्रमासाठी सांगवी विकास सोसायटीचे चेरमन श्री महादेवराव कदम, प्रदिप मोहिते, दिलीप मोहिते ,दिलीप सस्ते,श्री विक्रम मोहिते, डॉ. नाथा भोसले, श्री कुलदीप गुगळे तसेच फलटण शहरातील अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
हा उपक्रम सलग 10 दिवसासाठी गोरगरीब जनतेसाठी राबविला जात आहे , प्रती कुटुंब 1 लिटर दूध व दुग्धजन्य मिठाई मोफत दिली जात आहे.
गेले तीन चार वर्षापासून कोरोना काळात देखील फलटण, बारामती, माण, कोरेगाव , सातारा आणि लोणंद, बदलापूर, कुळगाव, डोंबिवली अशा अनेक शहरात गोरगरीब जनतेसाठी सलग दोन दोन महिने मोफत दूध वाटप करण्यात आले होते…..आज पुन्हा फलटण ,कोरेगाव आणि लोणंद या सारख्या शहरात गोर गरीब जनतेसाठी पी एन जी गाडगीळ अँड सन्स व पी एम डी मिल्क अँड फुड्स यांचे तर्फे मोफत दूध व दुग्धजन्य पदार्थ वाटपा च्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
हा उपक्रम राबविल्याबद्दल फलटण येथील तहसीलदार, नगरपालिका सि.ओ. साहेब व ग्रामस्थ, सर्वांनी मनापासुन पी एन जी अँड सन्स पी एम डी मिल्क चे खूप आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This