प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची 20 गावांमध्ये स्थापना

सातारा, दि.18 : ग्रामीण भागात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यास शक्ती प्रदत्त समितीने मान्यता दिली आहे. यानुसार सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 20 गावांची मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.

यामध्ये सातारा तालुक्यातील कोडेली, लिंब व नागठाणे, कराड तालुक्यातील विंग, सैदापूर, उंब्रज, रेठरे बु, खंडाळा तालुक्यात शिरवळ व पारगाव, खटाव तालुक्यात औंध व पुसेगाव, कोरगाव तालुक्यात वाठार स्टेशन, माण तालुक्यात गोंदवले बु, पाटण तालुक्यात मल्हार पेठ व तारळे, जावली तालुक्यात कुडाळ, फलटण तालुक्यात कोळकी, महाबळेश्वर तालुक्यात भिलार व वाई तालुक्यात यशवंतनगर व भुईंज या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, गावातील तरुण मंडळ यांनी योजनेची माहिती घेऊन मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This