विविध विभागांच्या समन्वयाने जन सुरक्षा मोहिम प्रभावी राबवावी

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

सातारा, दि.19 : केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत जन सुरक्षा मोहिम राबवावयाची आहे. ही मोहिम 1 हजार 370 ग्रामपंचायतींमध्ये प्रभावीणे राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहे.

ग्रमापंचायतस्तरावर होणाऱ्या मेळाव्यांचे नियोजन जिल्हा अग्रणी बँकेने केले असून 694 बँक शाखांमार्फत मोहिम राबविण्यात येणार आहे. ग्रामस्तरावर तसेच तालुकास्तरावर कार्यान्वित असणाऱ्या यंत्रणांनी उदा. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, अशा सेविका, ग्रामसंघ, अंगणवाडी सेविका, उमेद टीम शिक्षक यांनी सहभागी व्हावे. जिल्हा अग्रणी बँकेशी समन्वय साधून मेळावे यशस्वी करावे व जिल्हा जन सुरक्षा मोहिम अभियानात अग्रस्थानी राहील या पद्धतीने काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This