21 ऑक्टोंबर पोलीस स्मृतीदिन म्हणून होणार साजारा

सातारा, दि. 19 : १ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कर्तव्य बजावत असताना जे पोलीस अधिकारी व कर्मचारी धारातिर्थी पडले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी 8 वाजता पोलीस स्मृतीदिन पोलीस मुख्ययालय सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी या पोलीस स्मृतीदिन कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस दला तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This