लक्ष्मी सहकारी बँकेच्या ठेवीदारांसाठी आवाहन

सातारा, दि.20 : लक्ष्मी सहकारी बँकेच्या 1 लाखावरील सर्व ठेवीदारांना ठेव रक्कमेच्या 8 टक्के प्रमाणे रक्कम देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ठेवीदारांनी ठेव मागणी अर्ज बँकेची ठेव पोच पावी, ओळखपत्र, छायाचित्र व रहिवाशी पुरावा यांच्या साक्षांकित प्रती व आवश्यक प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे. तरी ठेवीदारांनी अर्ज 23 ते 30 ऑक्टोंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेवून जमा करावेत म्हणजे ठेवीदारांच्या रक्कम देण्याचे साईचे होईल, असे सहायक निबंधक सह संस्था, कोरेगाव यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This