उद्योगांनी महास्वयंम पोर्टलवर माहिती उद्यावत करण्याचे आवाहन

सातारा, दि.20 : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या महास्वयंम वेबपोर्टलवर मान्यता प्राप्त नोंदणीकृत खासगी आस्थापनांची आयुक्तालयाच्या रोजगार पोर्टलचे एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे. बहुतांश उद्योजक. नियोक्ते यांची माहिती अपूर्ण असल्याने एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना अडचण येत आहेत. कार्यालयाने दिलेला युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या आस्थापनांची माहिती भरावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत तळ मजला, सातारा येथे किंवा 02162-239938 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This