रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांच्या वतीने तरडगाव मधील विद्यार्थ्यांना 100 बेंच प्रदान

फलटण, दि.21 : रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांचे मार्फत श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे सौ वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव मधील विद्यार्थ्यांसाठी 100 बाक (बेंच) प्रदान करण्याचा कार्यक्रम विद्यालयात संपन्न झाला.

यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सुनील क्षीरसागर सर यांनी प्रास्ताविक केले यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या प्रेसिडेंट सौ. स्वप्ना कानिटकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बेंच देत असताना मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन केले व पुढील काळात विद्यालयातील प्रयोगशाळा ग्रंथालय व क्रीडा साहित्यासाठी भरीव स्वरूपाची मदत केली जाणार असल्याचे सांगितले. आमदार श्री दीपक चव्हाण साहेबांनी रोटरी क्लबच्या या कार्याचे कौतुक केले कमिन्स इंडियाचे श्री. प्रविण गायकवाड यांनी आतापर्यंत कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शाळेत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत त्यांनी नवनवीन कल्पना राबविणार असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव मा.डॉ.श्री सचिन भैय्या सूर्यवंशी बेडके यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन विद्यालयाच्या बांधकामाचा आढावा घेऊन नूतन इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस जाहीर केला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संतोष डांगे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. पंकज पवार सर यांनी केले यावेळी तरडगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, ग्रामस्थ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे प्रेसिडेंट सौ स्वप्ना कानिटकर व अध्यक्ष मिलिंद कानिटकर सेक्रेटरी श्री उत्तम आणि पूर्वदा बापट प्रोजेक्ट डायरेक्टर श्री विवेक जोशी चेअरमन श्री शशिकांत व मनीषा शिंदे श्री सूर्यकांत वझे, फलटण कोरेगाव चे आमदार श्री दिपकराव चव्हाण श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ.श्री. सचिन भैय्या सूर्यवंशी बेडके, राहुरी कृषी विद्यापीठाचे निवृत्त डीन श्री चंद्रकांत गायकवाड, ग्रामिण साहित्यिक श्री. बबन पोतदार, कमिन्स इंडियाचे सी.एस.आर. प्रमुख श्री प्रवीण गायकवाड, माजी सभापती श्री.वसंत काका गायकवाड, पं.समिती सदस्या सौ. विमलताई गायकवाड, तरडगावच्या सरपंच सौ.जयश्री चव्हाण, श्री. रवी गायकवाड सर, श्री.राजेंद्र गायकवाड, श्री.सुभाषकाका गायकवाड, श्री.संदीप गायकवाड यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This