कास पठारावरील जमीन विक्रीबाबतच्या खोट्या प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन

तहसीलदार राजेश जाधव

सातारा, दि. 23 : दसरा – दिवाळी सन २०२३ च्या निमित्ताने जमीन विक्रीबाबत आकर्षक जाहीराती व खोट्या प्रलोभनाला नागरीकांनी बळी पडू नये, असे आवाहन सातारा तहसिलदार राजेश जाधव यांनी केले आहे.
काही व्यक्ती / संस्था दसरा – दिवाळी सन २०२३ च्या निमीत्ताने कास पठारावरील जागा जमीन विक्रीबाबत आकर्षक जाहीराती देत आहे. याबाबत जमीन, प्लॉट घेणेपूर्वी सदर जमीन बिनशेती करणेसाठी सक्षम प्राधिकारी यांची परवानगी तसेच त्यानुषंगाने करणेच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे अगर कसे, याची शहानिशा करावी, अन्यथा भविष्यात निर्माण होणा-या कायदेशीर बाबींना आपण स्वतः जबाबदार रहाल, असे तहसीलदार सातारा यांचेकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This