कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी

सातारा , दि. 31 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

हा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्य तसेच ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकार, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This