शिधापत्रिकाधारकांसाठी आवाहन

सातारा , दि. 31 : सदय स्थितीत शिधापत्रिकेवरील वार्षिक उत्पन्न हे जुनेच नमुद आहेत. त्या उत्पन्नाच्या आधारे त्या वेळेस या योजनेत अनेक शिधापत्रिका धारक हे धान्यासाठी पात्र झालेले होते. आता इतके वर्षानंतर अनेक शिधापत्रिका धारकाचे वार्षिक उत्पन्नात वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे. तसेच सदर शिधापत्रिकातील पात्र लाभार्थी- सरकारी/ निमसरकारी नोकरी, खाजगी नोकरी, पेन्शन धारक, व्यवसायिक, बागायतदार शेती या उत्पन्नच्या स्त्रोताव्दारे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न् ग्रामीण करिता 44000/- व शहरी रु.59000/- पेक्षा जास्त आहे. तसेच चार चाकी वाहनधारक, आयकर भरणारे लाभार्थी, ज्या कुटुंबातील व्यक्ती परदेशात आहेत असे लाभार्थी तसेच स्वेच्छेने धान्य सोडणार असणारे लाभार्थी यांनी विहीत नमुन्यातील फॉर्म संबंधीत तलाठी / ग्रामसेवक यांचेकडे सुपुर्त करावे, असे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे.

तसेच ज्यांचे उत्पन्न् ग्रामीण भागाकरिता 44,000/- च्या पेक्षा जादा व शहरी भागापेक्षा 59000/- पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींनी अन्नधान्य योजनेतुन बाहेर पड़ा (Give It Up) चे फॉर्म जमा न केल्यास त्यांची पडताळणी तलाठी तथा ग्रामदक्षता समिती सचिव (सर्व), ग्रामसेवक तथा ग्रामदक्षता समिती सदस्य (सर्व) यांचे मार्फत करण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी. तसेच अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये 1 अथवा 2 सदस्य् असतील त्यांची शिधापत्रिकाही प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत.. सध्या आर्थिक उत्पन्न जादा असलेल्या कार्डधारकांनी स्वेच्छेने धान्य योजनेतुन बाहेर पडत आहे (Give It Up) फॉर्म भरून अन्नसुरक्षा योजनेतुन बाहेर पडावे असे अवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This