समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांनी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

सातारा, दि. 31 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वागिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातीत प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन २०२3-२4 साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा. ग्रंथालयांनी आपले प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन दत्तात्रेय क्षीरसागर ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This