आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर

सातारा , दि. 31: राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील 6 दिवसांमध्ये राज्यात अग्रेसर ठरला आहे. मागील 30 दिवसात 1 लाख 39 हजार 35 तर मागील 7 दिवसात 88 हजार 846 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या दोंन्ही योजनेमध्ये 17 लाख 62 हजार 900 लाभार्थ्यांचा समावेश असून त्यापैकी 8 लाख 2 हजार 859 इतके लाभार्थी आयुष्मयान भारत योजनेतील तर 9 लाख 60 हजार 41 इतके लाभार्थी महात्मा ज्योतिराव फुले योजनेतील आहेत.त्यापैकी आजअखेर 3 लाख 5 हजार 846 लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या नोंदणी व वितरणासाठी प्रशासनामार्फत शिबीरे घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यामध्ये ई-कार्ड नोंदणीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र व जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवक, परिचारिका, आशा सेविका यांच्याकडे आधार कार्ड देऊन नोंदणी करावी. त्याचबरोबर लाभार्थ्यांनी स्वत:च्या ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये प्ले-स्टोअरमधून आयुष्यमान भारत ॲप घेऊन त्याद्वारेही नोंदणी करावी, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This