दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून होणार तपासणी

सातारा, दि.30 : दिपावली सणाच्या काळात अन्नपदार्थत होणारी भेसळ रोखण्यासाठी व नागरिकांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न प्राप्त होईल यासाठी अन्न औषध प्रशासन मार्फत सक्रियपणे कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक डेअरीची तपासणी करून दुधाचे अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संबंधित डेअरींना नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ज्या डेअरी स्वच्छतेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर परवाना निलंबन अथवा रद्द करणे या प्रकारचे कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती (अन्न) अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This