कोरेगाव तालुक्यातील पाच सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सातारा, दि.30 : कोरेगाव तालुक्यातील पाच सहकारी संस्थांच्या 2023-24 ते 2027-2028 या कालवधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक कार्यक्रम कार्यालयाच्या व संस्थेच्या सूचना फल्कावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकारी संस्थेच्या सहायक निबंधक प्रिती काळे यांनी दिली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या संस्था पुढीलप्रमाणे : केदारेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, मर्या. कोरेगाव, मुनिसूव्रत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव, कोरगाव तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. कोरेगाव व रहिमतपूर पंचक्रोशी शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्था मर्या. रहिमतपूर ता. कोरेगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This