भाडळे येथे आयुष निदान व उपचार शिबीर संपन्न

सातारा, दि. 3 : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत भाडळे यांच्या संयुक्त विद्यमाने भाडळे, ता. कोरेगाव येथे आयुष आरोग्य वर्धिनी केंद्रात राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मोफत आयुष निदान व उपचार शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये 146 जणांची तपासणी करण्यात आली.

या शिबीराचे उद्घाटन भाडळे गावचे सरपंच रोहिदास घोरपडे व उपसरपंच गजाजन काजळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी किन्हई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिजीत पवार व डॉ.रुचाली ढोबळे उपस्थित होते.

या शिबिरामध्ये वार्धक्यजन्य आजार व वातव्याधीवर उपचार करण्यात आले, तसेच रक्तदाब, रक्तातील साखर, प्रकृती परीक्षण, आयुर्वेद आहार, दिनचर्या व ऋतुचर्या मार्गदर्शन व योग उपचार आणि आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा सल्ला देण्यात आला.

या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. पराग जोशी व डॉ. सारिका कांबळे यांनी रुग्णांवर चिकित्सा केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे व जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले. शिबीर यशस्वी करण्यासाठी आयुष आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वाती येल्लेवाड व औषध निर्माण अधिकारी विजय कदम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, किन्हई येथील कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले. या शिबिरास ग्रामस्थांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This