स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे 10 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन

वस्तुंची खरेदी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन

सातारा, दि. 2 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण व्हावी या उद्देश्याने दिपावली सणाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या लोकल बोर्ड नजीकच्या वाहन तळाच्या जागेत दि. २ ते १० नोव्हेंबर २०२३ कालावधीत स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) निलेश घुले, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील उमेद अभियानाचे काम पाहनारे सर्व व्यवस्थापक उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने दिपावली सणासाठी आवश्यक आकर्षक आकाश कंदील, पणत्या, सजावटीचे साहित्य, उटणे, तसेच विविध प्रकारचे मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, कोरफड लाडू, गोधडी, कापडी व कागदी पिशव्या, खेळणी, मशरूम बिस्किटे इ. निवडक व नाविन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे. या प्रदर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी भेट देऊन महिला स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादित वस्तुंची खरेदी करावी, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This