महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप

सातारा, 13 : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत महाज्योती JEE/NEET/MHT-CET-2025 चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील JEE/NEET/MHT-CET-2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व महाज्योतीकडून देण्यात आलेल्या टॅबलेटच्या माध्यमातून संबंधित प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधावी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडवून आपले नावलौकीक करावे व गुणवत्ता सुधारावी असे प्रतिपादन सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, यांनी महाज्योती मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे हा कार्यक्रम पार पडला. महाज्योती कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार कागदपत्रांची तपासणी करुन एकूण 33 विद्यार्थी/विद्यार्थीनींनी मोफत टॅबलेट, डाटा सिम, हेडफोन आणि कॅरीकेस यांची वाटप नितीन उबाळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This