क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या प्रस्तावासाठी 17 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सातारा, दि. 13 : क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर बाल संगोपन योजना राबविण्यासाठी इच्छुक संस्थांचे प्रस्ताव मागविण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिलेली असून 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला एसटी स्टॅण्ड जवळ, सातारा येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This