प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा, दि. 21 : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेची जिल्ह्यांत यशस्वी अमंलबजावणी करण्यात यावी अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी अंमलबजावणी यंत्रणांना केल्या.

प्रधान मंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जिल्हा अंमलबजावणी समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते. या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अंकुश मोटे, जिल्हा कौशल्य विकास विभाग सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत विशेष लक्ष देवून जास्तीत जास्त लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी योजनेचा प्रसार-प्रचार करावा. तसेच पात्र कारागीरांचा या योजनेत समावेश करावा, अशा सूचना करुन गाव पातळीवर संरपच, ग्रामसेवक यांनी जास्तीत लोकांना या योजनेचा फायदा घेणेसाठी प्रोत्साहित करावे, तसेच पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This