प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सातारा, दि. २२ : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी वारंवार बैठका घेत आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत विशेष लक्ष देवून जास्तीत जास्त लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी योजनेचा प्रसार-प्रचार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
पात्र कारागीरांचा या योजनेत समावेश करावा व गाव पातळीवर संरपच, ग्रामसेवक यांनी जास्तीत लोकांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, तसेच पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र प्लॉट नं. ए.13, एमआयडीसी, सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-246016 येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This