दिव्यांग व्यक्तिंना शनिवारी साहित्य वाटप होणार

सातारा, दि. 23 : सातारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभुत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी सातारा तालुक्यामधील दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता स्वं. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तरी सातारा तालुक्यातील ज्या दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेण्यात आलेले होते, त्या दिव्यांग व्यक्तींनी दिनांक 15 ते 28 डिसेंबर 2021 तसेच 21 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 या कालवधीत मोजमाप शिबिरामध्ये देण्यात आलेल्या पोचपावतीसह तसेच दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, युडीआयडीकार्ड/ युडीआयडीकार्ड साठी नोंदणी केलेली पावती, आधारकार्ड तसेच मतदान कार्ड यांच्या छायाकिंत प्रतीसह साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This