युवक-युवती, नव उद्योजकांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे पुणे येथे आयोजन

सातारा, दि. 21: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) सातारा मार्फत, जिल्हा उद्योग केंद्र, एम.आय.डी.सी. सातारा यांच्या सहयोगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय, मुंबई पुरस्कृत अनुसूचित जाती (SC ) प्रवर्गातील युवक-युवती, नव उद्योजकांसाठी 18 दिवस मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन “पुणे” येथे 12 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2023 या कालावधी मध्ये करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी शितल पाटील यांनी दिली आहे. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थींची चहा,नाष्टा,भोजन व निवास व्यवस्था एमसीईडी द्वारे मोफत केली जाईल. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यामधील 40 पात्र प्रशिक्षणार्थींची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार हा अनुसुचित जाती (SC) प्रवर्गातील तसेच 18 ते 50 वर्ष वयोगट व किमान 8 वी उत्तीर्ण आणि सातारा जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील स्वतःचा लघुउद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या युवक-युवती,नव उद्योजकांनी सदर प्रशिक्षणामध्ये सहभाग घ्यावा, असेही आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क :- सौ. शितल पाटील, प्रकल्प अधिकारी,एम.सी.ई.डी., द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, ऐ-13, एम.आय.डी.सी., सातारा मो.नं.: 8788190189, श्री.प्रशांत कांबळे, कार्यक्रम समन्वयक, एम.सी.ई.डी., मो.नं. : 9284738796, श्री. अभय बल्लाळ, कार्यक्रम आयोजक, एम.सी.ई.डी. सातारा, मो. नं. : 9763382625.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This