सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान रॅली उत्साहात

सातारा, दि. २६. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजवाडा येथील प्रताप सिंह हायस्कूलमध्ये प्रस्तावितिकेचे वाचन शाळा व पुतळ्याजवळ करण्यात आले. तद्नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान रॅलीची सुरुवात प्रतापसिंह हायस्कूल पासून होऊन सांगता नगरपरिषद चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ करण्यात आली. संविधान रॅलीमध्ये
समावेश असलेल्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी सदर कार्यक्रमास उस्फूर्त सहभाग दिल्याबद्दल समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी सर्वांचे आभार मानले . यावेळी विभागाचे अधिकारी, कर्मचारी , एम एस डब्ल्यू कॉलेजचे प्राध्यापक , प्रतापसिंह स्कूलचा शिक्षक वृंद, बंधुत्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने संविधान रॅलीमध्ये उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This