कृत्रिम अवयव व साधणे पुरविणे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा, दि.24 : दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कृत्रिम अवयव व साधने यासाठी आर्थिक सहाय्याची मर्यादा रु.25 ते जास्तीत जास्त रु.30 हजार पर्यंत राहील. या योजनेअंतर्गत दिव्यांगांना कॅलिपर, बुट, तीन चाकी सायकल, कर्णबधीरांसाठी श्रवणयंत्र, गरजुंना चष्मे इ.साहित्य देण्यात येते. यासाठी लाभार्थ्यांची दरमहा उत्पन्नाची मर्यादा 1500 पर्यंत व जास्तीत जास्त 2 हजार पर्यंत असावी.

कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या योजनेसाठी मासिक उत्पन्न 1500 रु. पर्यंत असल्यास 100 टक्के आर्थिक मदत मिळेल. मासिक उत्पन्न 1500 रु. ते 2 हजार रु. असेल तर 50 टक्के आर्थिक मदत मिळेल. यासाठी दिव्यांगांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या अटी व शर्ती या शासन निर्णयानुसार लागू राहतील.तरी या सदर योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This