ध्वजदिन निधी संकलनाचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ

सातारा, दि. 4 : ध्वजदिन-2023 चा निधी संकलन शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This