शिष्यवृत्ती परीक्षेची शाळा नोंदणी व आवेदनपत्र भरण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदत

सातारा, दि. 5 : इयत्ता 5 वी व इ.8वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे. नियमित शुल्क 7 डिसेंबरपर्यंत, विलंब शुल्क 8 ते 15 डिसेंबर, अतिविलंब शुल्क 16 ते 23 डिसेंबर व अति विशेष विलंब शुल्क 24 ते 31 डिसेंबर. यानंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This