फळे व भाजीपाला बांगाचे हॉर्टीनेट ट्रेसीबिलीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन नोंदणी सुरु; शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा, दि. 8 : फलोद्यान क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कृषि विभागामार्फत निर्यातक्षम फळे व भाजीपाला बांगाचे हॉर्टीनेट ट्रेसीबिलीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

ग्रेपनेट (द्राक्षे) जानेवारी 2024 पर्यंत, मँगोनेट (आंबा) डिसेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत, डाळिंब, भाजीपाला, लिंबुवर्गीय फळपिके, कांदा, केळी इत्यादी नोंदणी वर्षभर सुरु राहणार आहे. विहित प्रपत्रात अर्ज, 7/12 व 8-अ उतारा, बागेचा नकाशा व तपासणी अहवाल ही नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This