पुनर्वसनासाठी खातेदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा, दि. 13 : सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्री व्याघ्र क्षेत्रातील कोअर झोनमध्ये एकूण 52 गावांचे क्षेत्र आहे. त्यापैकी 19 गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे पुर्वीच पुनर्वसित झालेली आहेत. तसेच 18 गावांचे अभयारण्यातील हक्क कायम केलेले आहेत. उर्वरित 15 गावांचे पुनर्वसन अभयारण्याबाहेर करावयाचे आहेत. पुनर्वसन प्रक्रिया प्रगतीपथावर असून पुनर्वसन प्रक्रियेमध्ये मौजे डिचोली, पुनवली ता. पाटण व मौजे रवंदी, आडोशी, माडोशी, कुसापूर, खिरखिंडी, वेळे ता. जावली या गावातील पुनर्वसनाचा लाभ न घेतलेल्या खातेदारांनी पुनर्वसनाकामी सह्याद्री व्याघ्र राखीव कराड किंवा उपवनसंरक्षक, सातारा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This