भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

सातारा, दि. 01 : भारतीय सैन्यदल, वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड ( SSB) या परीक्षेची पुर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक येथे महाराष्ट्र शासणातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक नवयुवतीसाठी 8 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत SSB कोर्स क्र 56 आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यकमासाठी प्रशिक्षणार्थीची निवास , भेाजन आणि प्रशिक्षणाची नि:शूल्क सोय करण्यात आली आहे.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक यांचा ईमल आय डी : training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253- 2451032 व भ्रमणध्वणी क्रं 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This