माजी सैनिक / विधवांचे पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

सातारा, दि. 01 : माजी सैनिक / माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या मुलीसाठी रक्कम रू. ३६०००/- व मुलांसाठी रक्कम रू. ३०,०००/- शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी १२ वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवले आहेत व त्यानी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी सदर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सदर शिष्यवृत्ती मिळणेसाठीची अधिक माहीती www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदरचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ होती परंतु केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी प्रलंबीत प्रकरणे ऑनलाईन सादर करण्यासाठी संकेतस्थळ ०१ जानेवारी २०२४ ते ०५ जानेवारी २०२४ उपलब्ध होईल अशी माहीती दिली आहे, तरी पात्र लाभार्थ्यांनी दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते ०५ जानेवारी २०२४ अर्ज सादर करावेत असे मेजर आनंद पाथरकर, सेना मेडल (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This