दिव्यांगांसाठी हरित ऊर्जेवर चालणारे फिरते दुकान मिळणार

सातारा, दि. 01 : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातुन दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया जिल्हा स्तरावरून सुरू झाली असून दि.04 जानेवारी 2024 पर्यंत दिव्यांग व्यक्तींना अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. एस.एम. पवार यांनी दिली. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे तसेच कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा योजनेचा प्रमुख उददेश आहे.

प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like This